चिंता वाढली! दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये होतेय वाढ

दिल्ली: भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवार (13 मार्च) देशात कोरोनाच्या 192 रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता 3809 वर पोहोचली आहे.आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहिती नुलार केरळमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, आत्ता पर्यंत एकूण मृतांची संख्या 5,30,782 झाली आहे. संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या 4.46 कोटी (4,46,90,492) झाली आहे. तर आत्ता पर्यंत 98.80 टक्के लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 44156345 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचा दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्राने शनिवारी काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दरात हळूहळू वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले असून प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

भारतात देखील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निती आयोगाचे आवाहन

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन निती आयोगाच्या वतीने करण्यात आलं आहे. इन्फ्लूएंझाचा H3N2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे.या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात या संसर्गाची ३ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने