अजूनही आम्हाला अंडरवर्ल्डमधून धमक्या येतात.. क्रांतीचा धक्कादायक खुलासा

मुंबई: क्रांती रेडकर हे मनोरंजन क्षेत्रातील एक दिग्गज नाव. क्रांती मनोरंजना पलीकडेही बरीच चर्चेत असते, ती तिच्या नवऱ्यामुळे. क्रांतीचे पती समीर वानखेडे हे फार मोठे उच्च पदस्त पोलिस अधिकारी आहेत. अनेक महत्वाचे विभाग त्यांनी भूषवले आहेत त्यामुळे समीर आणि पर्यायाने क्रांती कायमच चर्चेत राहिले आहेत.समीर यांचे नाव खऱ्या अर्थाने चर्चेत आले तर आर्यन खान म्हणजेच शाहरुख खानच्या मुलाला अटक केल्या प्रकरणी. एका रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खान अमली पदार्थांचे सेव्हन करताना आढळला म्हणून त्याला समीर वानखेडे यांनी अटक केली होती. यामध्ये नंतर नवाब मलिक यांच्या जावयाचे नावही पुढे आले होते. या प्रकरणाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.



त्यावेळी हे प्रकरण गुन्हेगारी विश्व, अंडरवर्ल्ड इथपर्यंत पोहोचलं. मिडीयामध्येही याची बरीच चर्चा झाली. समीर यांची जात, धर्म सगळंच काढलं गेलं. यामध्ये क्रांती मात्र समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्याच प्रकरणा बवर क्रांतीने पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.प्लॅनेट मराठी ओटीटीच्या 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात ती बोलत होती. त्यावेळी क्रांतीला विचारण्यात आलं की लग्नानंतर तुझं आयुष्यात खऱ्या अर्थाने खूपच संघर्षमय झालं आहे. त्यावर क्रांती म्हणजे, 'दोन गोष्टींचं आम्हाला प्रचंड दडपण असतं एक म्हणजे अंडरवर्ल्ड' आणि 'व्यवस्था'.. आजही आमच्या कॉल वर आणि सोशल मीडियावर अंडरवर्ल्डचे धमक्यांचे मेसेज येतात. आम्ही तुम्हाला मारून टाकू, जाळून टाकू, तुमच्या मुलांना, कुटुंबाला नष्ट करू..'

पुढे क्रांतीला विचारण्यात येते की, तु समीरच्या मागे खूपच खंबीरपणे उभी आहेस.. त्यावर क्रांती म्हणते.. हो आहे. कारण जेव्हा लोक व्यवस्थेपुढे मिंधे होऊन जगत आहेत. अशावेळी एक माणूस सत्याच्या बाजूने आहे. आणि केवळ तो व्यवस्थेच्या विरोधात गेला म्हणून संपूर्ण सिस्टिम त्याच्यावर तुटून पडत आहे. आणि आजही एकटा याविरुद्ध लढा देत आहे.' असं क्रांती यावेळी म्हणाली.नुकताच जगभरात महिला दिन साजरा झाला. याच दिनाचे औचित्य साधत यावेळी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये क्रांती रेडकरने हजेरी लावली होती. यावेळी क्रांतीने तिच्या मुलींपासून ते नवऱ्यापर्यंतच्या सर्व गोष्टी उलगडल्या. एवढेच नाही तर तिच्या आणि समीर वानखेडे यांच्या आयुष्यातील काही सिक्रेट्स या टॉकशोमध्ये तिने उघड केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने