आम्ही दहावी नापास विद्यार्थ्यांसारखे झालो आहोत... टिझर लाँच वेळी राज ठाकरेंचा मिश्किल अंदाज

मुंबई:  केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत सिनेमात झळकत आहे.महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर आज राज ठाकरेंच्या हस्ते लाँच झाला.यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले.. "शाहीर आणि बाळासाहेब यांची फार जुनी मैत्री होती.



मी शाहिरांना लहानपणापासून पाहत आलोय. बाळासाहेबांना बाळ म्हणणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये शाहीर साबळे होते. या सिनेमाचं संगीत फक्त अजय - अतुल करू शक्य होते बाकी कोणी नाही.राज ठाकरे पुढे खास मिश्किल अंदाजात म्हणाले.. "हा सिनेमा 28 एप्रिलला रिलीज होतोय. त्यावेळी केदार मी नाहीये. मी बाहेरगावी जात आहे.. कारण निवडणूका सध्या मार्च - एप्रिल दरम्यान किंवा ऑक्टोबर अशा होत असतात.त्यामुळे आमची अवस्था सध्या दहावी नापास विद्यार्थ्यासारखी झाली आहे. अशा अंदाजात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शाहीर सिनेमाला शुभेच्छा दिल्या आणि सर्वांशी संवाद साधला.

महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या टिझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे. शाहिरांची धगधगती गाथा अंकुश चौधरीने या सिनेमातून जिवंत केलीय.या सिनेमात केदार शिंदेंची लेक सना शिंदे सुद्धा झळकत आहे. सिनेमात मृण्मयी देशपांडे लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. याशिवाय आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे सिनेमात झळकत आहे.अजय - अतुल आणि केदार शिंदे अनेक वर्षांनी एकत्र काम करत आहेत. सिनेमात शाहीर साबळेंची अनेक श्रवणीय गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने