वडिलांचा विरोध जुगारून १६ व्या वर्षी घर सोडलं, अन् आज आहे कोट्यावधीची मालकीण..

मुंबई: जिची वक्तव्य सतत चर्चेत असतात, आणि नवीन नवीन वाद ओढवले जातात अशा कंगना रनौतचा आज वाढदिवस. कंगनाने आजवर तिच्या अभिनयामुळे सर्वांच्या मनामनात घर केलं.फॅशन असो, क्वीन असो कि तनु वेड्स मनू कंगनाने नेहमीच तिच्या अभिनयाने सिनेमे गाजवले आहेत. आज यशस्वी अभिनेत्री असलेल्या कंगनावर एकवेळ अशी आली होती कि तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. काय होता तो किस्सा बघूया...



कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशातील मंडी येथे झाला. त्याच भागातून कंगनाने शालेय शिक्षण घेतलं. आपल्या मुलीने शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, अशी कंगनाच्या वडिलांची इच्छा होती. पण कंगनाची स्वप्न काहीशी वेगळी होती.वडिलांना वाटत होतं कि मुलीने डॉक्टर व्हावं पण कंगनाला शिक्षणात रस नव्हता. इतकंच नव्हे तर बारावीच्या परीक्षेत कंगना नापास झाली होती. तिला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. तिला अभिनेत्री व्हायचं होतं.कंगनाला कळत होतं कि अभिनेत्री होण्यासाठी कंगनाला घरातून तितका पाठिंबा नाही. तिचा निर्णय घरातले सदस्य मी मान्य करत नव्हते. त्यामुळे अभिनेत्री होण्यासाठी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी कंगनाने घर सोडले.

पुढे कंगना दिल्लीत आली आणि तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. २००६ ला आलेल्या गँगस्टर सिनेमातून कंगनाने अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं काहीच दिवसांपूर्वी कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली होती. कंगनाची मुंबईत तसेच मनालीमध्ये भव्य घरे आहेत. कंगनाने नुकतंच तिच्या मुंबईतील घराबद्दल एक व्हिडिओ शेयर केलाय. अभिनेत्रीने घराबाहेर एक विचित्र पाटी लिहिली आहे जी चर्चेत आहे.ती पाटी म्हणजे.. "कोणतंही अतिक्रमण नाही. अतिक्रमण करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील. आणि यातून बचावलेल्या माणसांना पुन्हा गोळ्या घातल्या जातील," असं या पाटीत लिहिले आहे. कंगनाच्या घराबाहेर असलेली हि पाटी चर्चेत आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने