जास्त बूट स्पेस पण किंमत कमी... भारतातील टॉप 5 स्कूटर

मुंबई: आज आपण भारतातील अशा टॉप 5 स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया ज्या चांगली बूट स्पेस देतात. या स्कूटर्स भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत... रिव्हर इंडी स्कूटरला 43-लिटर अंडरसीट स्टोरेज मिळतं. हे अंडरसीट स्टोरेज भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर स्कूटरपेक्षा जास्त आहे. या स्कूटरची स्टार्टिंग प्राईज 1.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.Ola S1, S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरना 36 लीटरचा बूट स्पेस मिळतो. Ola S1 ची किंमत 89,999 रुपये आहे, तर S1 Pro ची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. 



Ola S1 Air मध्ये 34 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 84,999 रुपये आहे. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे.या लिस्ट मध्ये ज्युपिटर 125 ही एकमेव पेट्रोल-स्कूटर आहे. यात 33-लीटर बूट स्टोरेज मिळते. स्कूटरची किंमत 82,825 पासून सुरू होते. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 26 लीटर अंडरसीट स्टोरेज देण्यात आलाय. त्याची सुरुवातीची किंमत 1.45 लाख रुपये आहे, जी एक्स-शोरूमनुसार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने