२०२४ च्या निवडणुकांसाठी भाजपा वापरणार 'साम, दाम, दंड, भेद'; जुन्या नेत्यांना....

मुंबई: भाजपा २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याचंही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता भाजपा एक नवीन खेळी करणार असल्याचं समोर येत आहे.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा पुन्हा एकदा जुन्या नेत्यांना साद घालणार आहे. जे नेते गेल्या काही वर्षांमध्ये फारसे सक्रिय नाहीत, त्यांना पुन्हा एकदा मैदानात आणलं जाणार आहे. म्हणजे नवे आणि जुने नेते या निवडणुकीसाठी एकत्रितपणे लढणारक आहेत.भाजपासाठी निष्ठेने काम केलेल्या पण काही दिवसांपासून पक्षाच्या कामापासून दूर राहिलेल्या जुन्या अनुभवी नेत्यांना भाजपा पुन्हा एकदा सक्रिय करणार आहे. त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचीही माहिती हाती येत आहे.स्व. उत्तमराव पाटील अमृतकुंज अभियानासाठी भाजपच्या जेष्ठ नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यात असून मधु चव्हाण यांच्याकडे प्रदेश संयोजक पद सोपवण्यात आलं आहे.



शिवसेनेसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एका भाषणात बोलताना जागावाटपाबद्दल सांगत होते. भाजपा शिंदेंच्या शिवसेनेसोबत २०२४ ची निवडणूक लढणार आणि २४० जागा लढवणार, असंही ते म्हणाले. मात्र काही वेळातच त्यांनी असं काही नाही, सांगत सारवासारव केली आणि जागावाटप झालेलंच नाही, असंही म्हणाले.त्यामुळे जागावाटपाबद्दलचा संभ्रम कायम आहे. पण बावनकुळेंच्या विधानामुळे शिवसेनेला फक्त ४८ जागा मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने