का देतो रोहित शेट्टी मराठी कलाकारांना बॉलीवुडमध्ये काम? त्यानेच सांगितलं कारण..

मुंबई: बॉलिवूडमधील धमाकेदार दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. आता तो धमाकेदार का आहे हे त्याचे चित्रपट पाहून कळतच. जोरदार अ‍ॅक्शन, आलीशान गाड्या आणि ह्युमरस कॉमेडी यांचा परफेक्ट मेळ साधून दर्जेदार चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आज वाढदिवस.. रोहित आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.रोहितचे अनेक चित्रपट आपण पाहिले आणि प्रेक्षकांनी अक्षरशः ते डोक्यावर घेतले. गोलमाल, सिंघम, सर्कस असा कोणताच चित्रपट आपण विसरू शकत नाही. पण त्याच्या सगळ्या चित्रपट एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे मराठी कलाकार.



रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटात आवर्जून मराठी कलाकारांना संधी देतो आणि तेही चांगल्या दर्जेदार भूमिका देतो. तो मराठी कलाकारांची निवड का करतो या मागेही एक खास कारण आहे, ते त्यानेच एका मुलाखतीत सांगितले आहे.रोहितच्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, अशोक सराफ, विजय पाटकर, सोनाली कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, वैदेही परशुरामी अशा अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकले आहेत. त्यामुळे तुझ्या चित्रपटात मराठी कलाकार असतात, त्यामागे नेमकं काय कारण आहे असे त्याला विचारले गेले.

यावेळी तो म्हणाला, 'मी मराठी कलाकारांना चित्रपटात का घेतो? हा प्रश्न मला खूप ठिकाणी विचारण्यात येतो. मात्र, यामागे एक खास कारण आहे. मराठी कलाकार हे एकदम साधे असतात. तत्यांचा अभिनय तर कमालीचा असतोच शिवाय त्यांना कुठलाही अहंकार नसतो.'पुढे तो म्हणाला, 'चांगला अभिनय येतो म्हणून काही कलाकार मंडळी नखरे करताना दिसतात. परंतु, मराठी कलाकारांमध्ये एक खास गुण आहे, तो म्हणजे ते कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. आमचे चित्रपट १०० कोटींचा बिजनेस करतात, यातला ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो. त्यामुळेच माझ्या चित्रपटात मराठी कलाकार असतात आणि नेहमीच असणार!’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने