रोहित शेट्टीचा पहिला मराठी सिनेमा, श्रेयस तळपदे - जितेंद्र जोशी - वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट

मुंबई: रोहित शेट्टी हे बॉलिवूड सिनेमातलं मोठं नाव. पैसा वसूल करणारे हटके कॉमेडी सिनेमे करण्याबाबत रोहित शेट्टीला ओळखले जाते. रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांशी खास नातं आहे. आता रोहित शेट्टी मराठीत एक सिनेमा घेऊन येतोय.या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोहित शेट्टी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा मराठी सिनेमाशी संबंध जोडणार आहे. सिनेमाचं नावस्कुल, कॉलेज आणि लाईफ या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर रिलीज झालीय. या सिनेमातून मित्रांची खास गोष्ट पाहायला मिळतेय.जितेंद्र जोशी गोदावरी नंतर पुन्हा एकदा स्कुल, कॉलेज आणि लाईफ सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेमात झळकणार आहे. जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर त्याला हा सिनेमा कसा मिळाला याचा अनुभव शेयर केलाय.



जितू लिहितो, एक दिवस रोहित शेट्टी सरांच्या कार्यालयातून संपर्क होतो, बोलावलं जातं समोर स्वतः रोहित सर आणि त्यांच्यासोबत विहान सूर्यवंशी नावाचा एक तरुण दिग्दर्शक .रोहित सर प्रेमाने सिनेमा करण्याची गळ घालतात परंतु विहान च्या तोंडून कथा ऐकल्यानंतर एक उत्तम प्रेमळ गोष्ट ऐकल्याचा आणि त्या गोष्टीतल्या तरुणाच्या प्रेमळ चाचा ची भूमिका करण्याची अनोखी संधी मिळाल्याचा आनंद होतो . चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात उत्तम पार पडतं .जितेंद्र जोशी पुढे लिहितो, मध्ये अनेक दिवस जातात आणि अचानक फोन वर समजतं की चित्रपट प्रदर्शित होतोय.एकीकडे आपण वेगळ्याच चित्रपटाचं हिमाचल प्रदेश येथे चित्रीकरण करताना या छोट्याशा ट्रेलर सोबत पुन्हा कोल्हापुरात येऊन धडकतो हीच कमाल आहे चित्रपट या माध्यमाची..

खरं तर तेजस्वी, करण आणि विहान या तिघांचा हा पहिला मराठी चित्रपट परंतु प्रदर्शित जरा वेळाने होतोय कारण चांगल्या गोष्टी मुरायला आणि साध्य व्हायला वेळ लागतोच सर्वांना शुभेच्छा!!असं म्हणत जितेंद्र जोशीने सिनेमाचा टिझर कसा वाटतोय हे त्याच्या फॅन्सना कळवायला सांगितलं आहे.सिनेमात श्रेयस तळपदेचा बॅकग्राऊंड आवाज दिसत असून जितेंद्र जोशी, वनिता खरात आणि बिग बॉस १५ फेम तेजस्वी प्रकाश झळकत आहे. १४ एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय १४ एप्रिलला स्कुल, कॉलेज आणि लाईफ हा सिनेमा रिलीज होतोय


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने