"पक्ष वयात आला तरी यांचं..."; कालच्या सभेनंतर संजय राऊतांचा टोला

मुंबई:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा पार पडली. या सभेनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर काल बोलले, त्यावरुन संजय राऊतांनी सुनावलं आहे. संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "मी त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण सकाळी वाचलं. पक्षाला १८ एक वर्ष होऊन गेली, पक्ष वयात आला तरी त्यांच्या पक्षाचं काय चाललंय मला माहित नाही.



अठरा वर्षानंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. उद्धव ठाकरे इतके मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे त्यांच्यावर बोलतात. नारायण राणे इतक्या वर्षांनंतर उद्धव ठाकरेंवर बोलतात, भाजपा, राज ठाकरे सगळेच उद्धव ठाकरेंवर बोलतात. उद्धव ठाकरेंची  सगळ्यांना भीती वाटते.राज ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, "तुम्ही तुमच्या पक्षावर बोला. राज्यात महागाई, बेरोजगारी असे प्रश्न उफाळून वर आलेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तो अमृतपाल पंजाबमधून महाराष्ट्रात घुसलाय. त्यावर कोणी बोलत नाही. पण तोफा फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरच. त्यामुळे उद्धव ठाकरेंची धास्ती आणि वय किती हे स्पष्ट होतं. वीस वर्षे झाली आता विसरा. तुम्ही, तुमचा पक्ष कुठे आहे ते बघा."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने