सैनिकाकडून 653 गोळ्या गायब; हुकूमशहाचा संपूर्ण शहरात Lockdown चा आदेश

उत्तर कोरिया: उत्तर कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. इथं हुकूमशहा किम जोंग उन यांनी एका शहरात लॉकडाऊन जाहीर केलाय.कारण, या शहरातील एका सैनिकाकडून 653 बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्या आहेत. आता त्या शोधण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.रेडिओ फ्री एशियानं  दिलेल्या वृत्तानुसार, 7 मार्चला लष्कर जवान माघारी येत असताना 653 बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्या. जोपर्यंत सर्व गोळ्या सापडत नाहीत, तोपर्यंत शहरात लॉकडाऊन राहील, असा आदेशचं शासनानं काढला. सध्या पोलीस आणि लष्कर दोघं मिळून त्याचा शोध घेत आहेत. मात्र, 10 दिवस उलटून गेले तरी अद्याप या गोळ्या सापडलेल्या नाहीत.



रेडिओ फ्री एशियाच्या वृत्तानुसार, ही घटना रियांगगँगच्या उत्तर भागातील हेसन शहरात घडलीये. या शहरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळं दोन लाख लोकसंख्या घरात कैद झाली आहे. बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्यापासून सैनिकांची शोध मोहीम सुरू आहे. अधिकारी घरोघरी शोधमोहीम राबवत आहेत.अहवालानुसार, 7 मार्च रोजी कोरियन पीपल्स आर्मी 7 वी बटालियन या भागातून परतली. कोविड-19 साथीच्या सुरूवातीला चिनी सीमा बंद करण्यासाठी 2020 मध्येच 7 वी बटालियन तैनात करण्यात आली होती. कोरोनाचं संकट संपल्यानंतर लष्कराला माघारी बोलावण्यात आलं. दरम्यान, गोळ्या गायब झाल्या.सुरुवातीला स्वत: जवान गोळ्यांचा शोध घेण्यात व्यस्त होते, पण गोळ्या काही सापडल्या नाहीत. तेव्हा अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर लॉकडाऊन लागू करून संपूर्ण शहर सील करण्यात आलं. वृत्तानुसार, संपूर्ण शहर सील करण्यात आलं आहे. पोलिस आणि लष्कराकडून घरोघरी झडती सुरू आहे. मात्र, तपास सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरी कोणताही सुगावा लागलेला नाही.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने