"जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात ते..."मोहित कंबोजचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी सध्या अनिक्षा जयसिंघानी पोलिसांच्या ताब्यात आहे. तिचे वडील आणि बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. याच प्रकरणात भाजपाचे मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे.मोहित कंबोज यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अनिल जयसिंघानीला उद्धव ठाकरेंचा फ्रंट मॅन असं म्हटलं आहे. 



तसंच ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सूचक इशारा दिला आहे.आपल्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज म्हणतात, "उद्धव ठाकरेंचे फ्रंट मॅन बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणि एक माजी पोलीस आयुक्त तुम्ही तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा. तुमचं सत्यही लवकरच उघडं पडेल. जे लोक दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात, ते स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यामध्ये पडतात".जयसिंघानी गेल्या सात वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल होते. अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर आज त्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा हिला पोलिसांनी अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने