2046 मध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ला जग नष्ट होणार? 'नासा'नं दिला धोक्याचा इशारा, जाणून घ्या कारण

वॉशिंग्टन : 2046 मध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ला एक लघुग्रह  पृथ्वीवर आदळू शकतो, असा इशारा नासानं  दिला आहे. नासा या लघुग्रहावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.शास्त्रज्ञांना दोन आठवड्यांपूर्वी असं आढळून आलं की, हा लघुग्रह मोठ्या धोक्याचं कारण बनू शकतो. मात्र, त्याची शक्यता कमी आहे; पण तरीही शास्त्रज्ञांनी या ग्रहाला यादीत वरच्या स्थानावर ठेवलंय. हा लघुग्रह 2023DW म्हणून ओळखला जातो. नासाच्या म्हणण्यानुसार, 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा याचा शोध लागला. सीबीएस न्यूजनुसार, नासानं या लघुग्रहाला धोकादायक यादीत टाकलंय. पृथ्वीवर परिणाम करणाऱ्या लघुग्रहांची नाव या यादीत आहेत.



सध्या केवळ 2023 DW ला क्रमांक 1 वर ठेवण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, सध्या यापासून कोणताही धोका नाही. यादीनुसार, 2047 ते 2051 'व्हॅलेंटाईन डे'वर लघुग्रहांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.NASA नं ट्विट केलंय की, 'आम्ही 2023 DW नावाच्या एका नवीन लघुग्रहाचा मागोवा घेत आहोत. 2046 मध्ये पृथ्वीवर आदळण्याची याची शक्यता फारच कमी आहे. बर्‍याचदा नवीन वस्तू पहिल्यांदा शोधल्या जातात, तेव्हा अनिश्चितता कमी करण्यासाठी आणि भविष्यात त्यांच्या कक्षाचा पुरेसा अंदाज लावण्यासाठी अनेक आठवड्यांचा कालावधी लागतो. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसचं म्हणणं आहे की, 'पृथ्वीवर आदळण्याची या ग्रहाची शक्यता अद्याप खूप कमी आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने