नागालँडमध्येही राष्ट्रवादीचा डंका; 6 विधानसभा मतदार संघात आघाडी तर...

नवी दिल्ली: महाराष्ट्रात झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीला भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात विजय मिळाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चैतन्याचं वातावरण आहे. मात्र चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका वाजला आहे.नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सहा विधानसभा मतदार संघात आघाडी मिळवली असून एका मतदार संघात विजय मिळवला आहे. तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. दरम्यान नागालँडमध्ये राष्ट्रीय संयुक्त पुरोगामी पक्षाला १० जागांवर विजय मिळाला असून एकूण १४ जागांवर आघाडी आहे. भाजपला तीन जागांवर विजय मिळाला असून ९ जागांवर आघाडी आहे.







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने