क्रिकेटच्या इतिहासात आगळावेगळा निर्णय! आयपीएलमध्ये आता वाइड अन् नो बॉलवर...

मुंबई:  क्रिकेटमध्ये कसोटी असो, ODI असो किंवा टी-20 असो.... सर्वच ठिकाणी 1-1 धाव महत्त्वाची आहे. एखादा कॅच किंवा अगदी एखादी रन यावर सामन्याचा निकाल लागतो. यात DRS चाही समावेश आहे. एखादा खेळाडू बाद आहे की नाही याबद्दल शंका असेल तर DRS च्या मदतीने शहानिशा करता येत.पण काही वेळा एखाद्या नो बॉल किंवा वाइड बॉलमुळेही सामना फिरतो. त्यामुळे आता क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे. आता महिलांचे WPL सुरू आहे, ज्यामध्ये क्रिकेटमधील DRS मध्ये बदल करण्यात आला आहे. आगामी आयपीएलमध्येही हा नवा नियम लागू होणार आहे.महिला प्रीमियर लीग मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात आहे. अंतिम सामना 26 मार्च रोजी होणार आहे, त्यानंतर पाच दिवसांनी 31 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे.पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्याच होणार आहे. आयपीएल आणि क्रिकेटमध्ये डीआरएसचा नियम खूप महत्त्वाचा झाला आहे, पंचांच्या चुकीच्या निर्णयाला बळी पडणाऱ्या खेळाडूंसाठी हे वरदान आहे. या वरदानात आणखी एका नियमाचा समावेश करण्यात आला आहे.



क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, आयपीएल 2023 पासून आणखी एक नियम समाविष्ट केला जाणार आहे. नो बॉल किंवा वाइड बॉलवरही खेळाडूंना आता डीआरएस घेता येणार आहे आहे. बॅट्समनच्या मागून बॉल बाहेर आल्याने अंपायरला वाटले की चेंडू काही भागाला स्पर्श करून मागे गेला आणि जर त्याने वाइड दिला नाही तर बॅट्समन त्यावर रिव्ह्यू घेऊ शकेल. गोलंदाजी संघाचेही असेच होईल, जर त्यांना वाटले की वाइड नाही पण पंचांनी वाइड दिले आहे. तर ते रिव्ह्यू घेऊ शकतील. यासाठी एक कालमर्यादीत 15 सेकंदात डीआरएसचा निर्णय घेता येईल.महिला प्रीमियर लीगपासून हा नियम सुरू करण्यात आला असून पहिल्या सामन्यातही त्याचा वापर करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज सायका इशाकने टाकलेला चेंडू मैदानावरील पंचांनी वाईड घोषित केला. यावर मुंबईने रिव्ह्यू घेतला आणि अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. रिप्ले पाहिल्यानंतर असे दिसून आले की चेंडू फलंदाजाच्या ग्लोव्हजला लागला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने