फक्त गणितच नाही आणखी २ विषयांचे पेपर लीक; पोलिसांची धक्कादायक माहिती

मुंबई:बारावीच्या परीक्षेच्या पेपरफुटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. बारावीचा फक्त गणिताचाच नव्हे, तर केमिस्ट्री आणि फिजिक्सचाही पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे.बारावी बोर्डाच्या गणिताच्या पेपरफुटीच्या चौकशीदरम्यान फिजिक्स आणि केमिस्ट्रीचेही पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भांबरे कृषी व विज्ञान ज्युनियर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.



३ मार्चला गणिताचा पेपर फुटण्याआधी २७ फेब्रुवारीला फिजिक्स आणि १ मार्चला केमिस्ट्रीचा पेपर फुटला होता. परीक्षेच्या एक तास आधी विद्यार्थ्यांना व्हॉटसपवरुन पेपर शेअर करण्यात आले होते, असे पुरावे सापडले आहेत. शिक्षकांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे, त्यातून मोबाईलच्या व्हॉटसपचा डाटा मिळवला आहे.पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या महाविद्यालयात ३३७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ११९ विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यांचंच महाविद्यालय आलं होतं. त्यामुळे आपल्या कॉलेजचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून शाळा व्यवस्थापनानेच पेपर फोडला. तसंच प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉटसपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी १० हजार रुपये घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने