२४ कोटी मुसलमानांना चीनमध्ये पाठवणार का? फारुख अब्दुल्लांचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली :  नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी (11 मार्च 2023) पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाची धार्मिक आधारावर विभागणी करू नका, अशी मागणी अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला केली.खोऱ्यातील बिगर भाजप पक्षांच्या बैठकीनंतर जम्मूत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणाले की, समुदायांना एकमेकांच्या विरोधात उभे केले जाऊ नये. भीती आणि द्वेषाचे राजकारण नवीन नाही. पण तुम्ही २२-२४ कोटी मुस्लिमांचे काय करणार? तुम्ही त्यांना समुद्रात फेकाल की चीनला पाठवणार, असा सवालही अब्दुल्ला यांनी केला.



'गांधीजी रामराज्याबद्दल बोलत होते. रामराज्य म्हणजे कल्याणकारी राज्य जिथे सर्वांना समान संधी मिळतील आणि कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. आपण सर्वांनी गांधीजींच्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे.अब्दुल्ला यांनी दिवसभरात डझनभर पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणुका आणि राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा निर्णय घेऊन या बैठकीचा समारोप झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने