जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्यांना फडणवीसांचं 'हे' आवाहन!

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. पण या आंदोलकांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी कर्मचाऱ्यांना नव्या पेन्शनची भीती का वाटते याचं कारणही दिलं आहे. फडणवीस म्हणाले, नवीन पेन्शनला लोकांचा विरोध का आहे किंवा त्याबाबत भीती का आहे? तर त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे काही लोकांनी पेन्शनचं कॉन्ट्रिब्युशन भरलेलं नाही, त्यांचं काय होणार? यामध्ये २००५-१० या काळात काही घटकांनी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन भरलेलं नाही. 



सध्या तर १४ टक्के सरकार आणि १० टक्के कर्मचाऱ्यांचे असतात. दुसरी भीती म्हणजे, लोकांना असं वाटतं की पेन्शन योजना ही शेअर बाजाराशी जोडलेली आहे. पण जगातील सर्व पेन्शन निधी या मार्केट लिंक्ड असतात. ते शेअर्सवर लावत नाहीत. आपल्या बँका, इन्शुरन्स कंपन्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतात. कारण आज बँकांमध्ये आज तीन ते चार टक्के व्याज मिळतं. पण महागाईचा दर ७ टक्के आहे. त्यामुळं दरवर्षी आपल्या पैशाची किंमत कमी होते पण वाढत नाही. म्हणून अशा ठिकाणी ते गुंतवावे लागतात जिथं महागाईच्या दराच्या किंवा त्यापेक्षा अधिक परतावा मिळेल.

त्यादृष्टीनं हे पैसे फंड मॅनेजर गुंतवतात. त्याची गॅरंटी सरकार घेत असते. पण यामध्ये आम्हाला नेमके किती पैसे मिळणार? ते मिळणार की नाही? ते शेअर बाजाराशी जोडलेले असतील का? बाजार पडला तर आमचं काय होणार? अशा त्यांच्या वास्तविक शंका आहेत. त्यामुळं आमच्याकडं आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की, निवृत्तीधारकाराला पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. पण यासाठी आपण समिती तयार करु, ही समिती आत्ताचं दायित्व आणि पुढचं दायित्व निश्चित करु. त्यानंतर चार-पाच पद्धतीनं आपण त्यावर काम करु.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने