मुस्लिमांच्या घरांवर, मशिदीवर दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक

कर्नाटक: कर्नाटकात काही मुस्लिमांच्या घरांवर आणि मशिदीवर दगडफेक झाल्याची बातमी समोर येत आहे. ही घटना हावेरी जिल्ह्यातील आहे.इथं हिंदू संघटना आणि कुरुबा समुदाय संघटनांनी रॅलीदरम्यान मुस्लिमांच्या घरांवर आणि मशिदीवर दगडफेक केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी हिंदू संघटनांचे सदस्य क्रांतिकारक संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला घेऊन बाइक रॅली काढत होते. 



ही रॅली मुस्लीम वस्तीतून जात असताना काही हल्लेखोरांनी घरांवर आणि मशिदीवर दगडफेक केली.इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या प्रकरणाची माहिती देताना हावेरीचे एसपी शिवकुमार म्हणाले, ही बाईक रॅली शांततेत पार पडली होती. मात्र, काही बदमाशांनी मशिदीजवळ येताच दगडफेक सुरू केली. 9 मार्चलाही असंच प्रकरण समोर आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. याआधीही जातीय वातावरण बिघडवण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी गुरुग्राममध्ये एका मशिदीला लक्ष्य करण्यात आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने