भगव्याला शोभा पराक्रमाची.. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनी प्राजक्ताची खास पोस्ट

मुंबई: आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस. छत्रपती संभाजी महाराजांची हुशारी, पराक्रम आणि अन्याय सहन न करण्याची त्यांची लढाऊ वृत्ती अशा अनेक गोष्टी गेल्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या गोष्ट आहेत.संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी महाराष्ट्राच नव्हे तर देशभरातील तमाम जनता त्यांचं स्मरण करत आहे. अशातच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने खास पोस्ट शेयर केलीय जी चर्चेत आहे.अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हेंसोबत शिवपुत्र संभाजी या महानाट्यात अभिनय करत आहे. प्राजक्ता या नाटकात संभाजी महाराज्यांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारत आहे.



प्राजक्ताने याच नाटकातील एका खास प्रसंगांचा फोटो शेयर करत पोस्ट लिहिली आहे कि, अंगणाला शोभा तुळशीची ,म्यानाला शोभा तलवारीची ,भगव्याला शोभा पराक्रमाची.‌..आणि छत्रपती संभाजी महाराजांना शोभा महाराणी येसूराणी साहेबांची..प्राजक्ताच्या या फोटो आणि पोस्टवर तिच्या फॅन्सनी पसंती दर्शवली असून सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण केले आहे.प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सुद्धा अमोल कोल्हेंसोबत अभिनय केला होता. याही मालिकेत अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकले तर प्राजक्ता गायकवाड महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली.

पुणे जिल्ह्यातील वढू इथं होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाच्या नावात शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा बदल केला आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली.संभाजी महाराजांच्या या बलिदान स्थळाच्या विकास आराखड्याचं सुधारित नाव आता 'स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ' असं असणार आहे.प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हेंसोबत शिवपुत्र संभाजी नाटकात अभिनय करत आहे. या नाटकाचे महाराष्ट्रभरात दौरे सुरु आहेत.काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच १ ते ६ मार्च २०२३ दरम्यान जोल्ले शिक्षण संकुल निपाणी येथे या नाटकाचे भव्य दिव्य प्रयोग रंगले. या नाटकात प्राजक्ता छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने