WTC 2021-23 लीग स्टेज संपली! फायनल पॉइंट टेबलची स्थिती अन् बक्षीस रक्कम जाणून घ्या!

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा लीग टप्पा न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसह संपला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने WTC 2021-23 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.इंग्लंडमधील ओव्हलवर 7 जूनपासून दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाची लढत रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने 66.67 टक्के गुणांसह प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 58.8 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.भारत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. मागील आवृत्तीत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.



श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून प्रथमच डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत प्रवेश करण्याची शेवटची संधी होती, परंतु संघाने मालिका 0-2 ने गमावली, त्यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. या पराभवामुळे श्रीलंकेला बक्षीस रकमेतही मोठा फटका बसला आहे.खरेतर, मालिकेपूर्वी श्रीलंका डब्ल्यूटीसी गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर होता, परंतु न्यूझीलंडकडून क्लीन मिळाल्यानंतर ते पाचव्या स्थानावर घसरले आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या बक्षीस रकमेबद्दल बोलताना, आयसीसीने अद्याप या आवृत्तीसाठी बक्षीस रक्कम जाहीर केलेली नाही. मात्र मागील आवृत्तीच्या आधारेच संघांना बक्षीस रक्कम दिली जाणे अपेक्षित आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघाला मागील आवृत्तीत 'टेस्ट मेस'सह 11.72 कोटी रुपये ($1.6 दशलक्ष) बक्षीस रक्कम देण्यात आली होती, तर पराभूत संघाला 5.86 कोटी रुपये ($8 दशलक्ष) मिळाले होते.ICC ने पहिल्या 5 संघांना वेगवेगळी बक्षीस रक्कम दिली होती, तर शेवटच्या चार संघांना $1-1 लाख म्हणजेच 1.46 कोटी रुपये मिळाले होते. तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला $4.5 लाख (सुमारे 3.3 कोटी रुपये), चौथ्या क्रमांकाच्या संघाला $3.5 लाख (सुमारे 2.5 कोटी) आणि पाचव्या स्थानावरील संघाला $2 लाख (सुमारे 1.46 कोटी रुपये) मिळाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने