एरिक गार्सेट्टी भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत; दोन वर्षानंतर यूएस सिनेटची मंजुरी

अमेरिका: अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. समितीनं भारतातील राजदूतपदासाठी लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेट्टी  यांच्या नावाला मंजुरी दिलीये.अध्यक्ष जो बायडेन  यांनी एरिक गार्सेट्टी यांच्या नावाचा प्रस्ताव समितीकडं पाठवला होता. जानेवारी 2021 पासून भारतात अमेरिकेचा एकही राजदूत नव्हता.जवळपास दोन वर्षानंतर अमेरिकेनं भारतात आपला स्थायी राजदूत नियुक्त केलाय. डेमोक्रॅटच्या सर्व सदस्यांनी एरिक गार्सेट्टी यांच्या बाजूनं मतदान केलं.



भारतातील अमेरिकेच्या राजदूतासाठी एकूण 52 मतं पडली, त्यापैकी गार्सेट्टी यांच्या बाजूनं 42 मतं पडली.सर्व डेमोक्रॅट्स तसंच रिपब्लिकन सिनेटर टॉड यंग आणि बिल हर्टी यांनीही एरिक गार्सेट्टीच्या बाजूनं मतदान केलं. एरिक गार्सेटी हे अध्यक्ष बायडेन यांच्या निवडणूक प्रचाराचे सह-अध्यक्ष होते. ते बायडेन यांच्या जवळचे मानले जातात. एरिक यांचा बायडेन यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, असंही मानलं जात होतं. परंतु, जेकब्सचा वाद ज्या प्रकारे उलगडला, त्यामुळं ते शर्यतीतून बाहेर पडले. एरिकवर रिक जेकब्सवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने