नामांतरावरुन उद्योजकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; खासदार जलील म्हणाले...

छत्रपती संभाजी नगरः औरंगाबाज जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजी नगर ठेवण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी मागील काही दिवसांपासून आंदोलनाचं हत्यार उपसलेलं असून नामांतराला विरोध केला आहे.दरम्यान, छत्रपती संभाजी नगर येथील उद्योजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामधून त्यांनी शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, शहरात सुरु असलेल्या उपोषणामुळे आणि आंदोलनामुळे परिस्थिती बिघडू शकते.. अशा आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना धाडलं आहे.याच मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील संतापले असून उद्योजकांनी नामांतराबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, असं म्हटलं आहे. सरकारने ठेवलेलं नाव आम्हाला मान्य नाही किंवा आहे, याबाबत उद्योजकांनी बोलावं, असं आवाहन जलील यांनी केलं आहे.



लोट्यासारखं वागू नका- जलील

उद्योजकांनी नेमका स्टँड घ्यावा, लोट्यासारखं कुणीकडेही लवंडू नये. हेही पाहिजे आणि तेही पाहिजे याला काहीच अर्थ नाही. खरं-खोटं, चांगलं-वाईट याबद्दल नेमकं कोहीतरी ठरवावं, अशा शब्दात जलील यांनी उद्योजकांच्या पत्रावर भाष्य केलं.औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आठवड्याभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. उपोषण हे फक्त आगामी आंदोलनाची सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने