"तिचं आयुष्य बरबाद होईल"; व्हायरल व्हिडीओनंतर भाजपा आमदार आक्रमक

मुंबई: शीतल म्हात्रे आणि भाजपा आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विधानसभेतही आज या व्हिडीओचा विषय झाला. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असल्याचं सांगत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आज अधिवेशनात करण्यात आली आहे.याबद्दल भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला आहे. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनामध्ये केली आहे. तसंच आमदार यामिनी जाधव यांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. शीतल म्हात्रेंचं आयुष्य या प्रकरणात बरबाद होईल, असंही चौधरी म्हणाल्या आहेत.



याबद्दल बोलताना मनिषा चौधरी म्हणाल्या,"शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचं. यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ती विवाहीत महिला आहे. ज्याने हे केलं त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत."या प्रकरणात शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक कऱण्यात आली आहे. यातल्या काही जणांचं उद्धव ठाकरे गटाशी संबंध असल्याचंही आढळून आलं आहे. पण या तिघांविरोधात आता आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने