"देशाच्या बँका बुडवणारे लोक मुंबई भाजपमध्ये..." ; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

मुंबई: महाराष्ट्रात ईडीची विरोधकांवर मोठी कारवाई सुरू आहे. काल शिवसेना नेते सदानंद कदम यांना अटक करण्यात आली. त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप सरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर आपलू भूमिका स्पष्ट केली. संजय राऊत म्हणाले, सदानंद कदम यांना अटक केली. हे आधीच मुलुंडच्या पोपटाला माहित होते. ईडीने सांगण्यापूर्वी किरीट सोमय्या यांना कसे माहित झाले. तसेच हसन मुश्रीफ यांची  FIR कॉपी आधी किरीट सोमय्या यांनी कशी मिळते, याबाबत कोर्टाने देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. 



आम्ही अनेक वर्ष सांगत आहोच किरीट सोमय्या यांच्या विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा, मात्र त्यांला क्लीनचिट मिळत आहे. या देशाच्या बँका बुडवणारे लोक मुंबई भाजपमध्ये काम करतात आणि आमच्यावर हल्ले करतात, असे संजय राऊत म्हणाले. कसबा निकालानंतर महाविकास आघाडी गतीने पुढे जात आहे. ही गती थांबवण्यासाठी कारवाई सुरू आहेत. ह्या सर्व कारवाई बोगस आहेत. अनिल देशमुख आणि माझ्या प्रकरणात कोर्टाने हे स्पष्ट सांगितलं आहे. जे विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात ईडीचा गैरवापर सुरू आहे. मात्र आम्ही घुडगे टेकणार नाही. सत्तेचा कुणी अमरपट्टा घेऊन आलं नाही. २०२४ नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून मारेल, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने