कोल्हापूरात चिमण्यांचा वाढला चिवचिवाट

कोल्हापूर : विविध जनजागृतीपर उपक्रम आणि कृती कार्यक्रमांमुळे चिमण्यांचा किलबिलाट वाढला असून, चिमणी आणि एकूणच पक्ष्याबाबत जागरूकता वाढली आहे. विविध प्रयत्नानंतर अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी लोकांनीच आता ‘सकाळ’ने सुरू केलेली चला चिमण्या वाचवू या ही मोहीम हाती घेतली आहे.दरम्यान, चिमण्या आणि इतर पक्ष्यांच्या अधिवासाबरोबरच उन्हाळ्यात त्यांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी विविध संकल्पना यशस्वी होत आहेत.



दृष्टिक्षेपात मोहीम...

  • ‘सकाळ’ने २० मार्च २०१२ ला ‘चला, चिमण्या वाचवू या’ अशी साद कोल्हापूरकरांना घातली

  • ‘सकाळ’च्या पुढाकारांनी लोकांना चिमण्यांच्या घरट्यांचे वाटप झाले.

  • खास पक्ष्यांसाठी म्हणून कुंभार गल्लीमध्ये जलपात्रे तयाार होऊ लागली.

  • चिमण्यासह इतर पक्ष्यांच्या जतन व संवर्धनासाठी विविध माहितीपट व लघुपट दाखवले.

  • २०१६ पासून लोकसहभागातूनच जलपात्रे, घरट्यांची निर्मिती व वितरणाला प्रारंभ

वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिकांनी घर बांधकामाचे प्लॅन्स बनवितानाच चिमण्या व पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने निर्माण करण्यासाठी आवश्‍यक डिझाइन्सवर भर दिलाटेरेस बागेत चिमण्या व पक्ष्यांसाठी सुविधा देताना फूडकोर्ट, वॉटर-ज्यूस सेंटर, स्वीमिंग सेंटर अशा संकल्पना पुढे आल्या आणि त्या यशस्वी झाल्या.सुरुवातीला चेतना विकास मंदिरमध्ये सुमारे १०० घरट्यांना प्रत्येक वर्षी मागणी असायची. ती आता ५०० वर पोहोचली असून, घरटे तयार करणाऱ्या संस्थांचीही संख्या वाढली आहे. लोकांमध्ये चांगली जागृती झाली असून चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा अनुभवायला मिळत आहे.निसर्गमित्र संस्थेने चिमण्या व पक्ष्यांसाठी आवश्यक आचारसंहिता लोकांना समजून सांगण्यावर भर दिला आहे. दुधी भोपळा, टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी घरटी कशी तयार करावी, याबाबतची प्रबोधन मोहीम हाती घेतली आहे.

- अनिल चौगुले, निसर्गमित्र संस्था

वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून चिमणी व पक्ष्यांसाठी जलपात्रे तयार केली जात आहेत. विद्यार्थी व पालकांचा अशा कार्यशाळांना प्रतिसाद मिळत असून, संस्थेकडील जलपात्र व घरट्यांची मागणी पाचपटीने वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने