ही विद्यार्थ्यांची चूक', दहावीच्या व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाचं स्पष्टीकरण

मुंबई: सोशल मीडियात व्हायरल वेळापत्रकाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. व्हायरल वेळापत्रकामुळे अनेकांचा हिंदीचा पेपरच बुडाला आहे. त्यामळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवण ही विद्यार्थ्यांची चूक आहे. असं म्हणत व्हायरल वेळापत्रकावर बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे.एसएससी बोर्डाच्या वेळापत्रकात जो पेपर 8 मार्चला दाखवण्यात आला होता. तोच पेपर व्हायरल वेळापत्रकात 9 मार्चला दाखवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आणि अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. यावर आता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.



ही विद्यार्थ्यांची चूक......

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवण ही विद्यार्थ्यांची चूक असल्याचे म्हटले आहे. त्यांना सांगितल होत व्हायरल होणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. पण त्यांनी ठेवला.किती विद्यार्थ्यांचा पेपर चुकला आहे, त्याची लेखी आकडेवारी आलेली नाही. प्रत्येक विषयाचे विद्यार्थी वेगळे असतात. अधिकृत आकडेवारी मिळण्यासाठी उशीर लागतो. मात्र, एकूण ५० विद्यार्थ्यांनी पेपर दिले नसल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने