'मानो या ना मानो' अमोल कोल्हे पुन्हा डॉक्टरकीकडे वळले ? व्हायरल व्हिडिओने चर्चेला उधाण

मुंबई: डॉ.अमोल कोल्हे हे सध्या राजकीय नेते असले तरी एक उत्तम नटही आहेत हे आपण सगळेच जाणतो. आणि त्याहून अधिक त्यांच्याबाबतीत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नट म्हणून आपली कारकिर्द भले गाजवली असली तरी ते शिक्षणाने मात्र डॉक्टर आहेत बरं का.डॉ.अमोल कोल्हे यांनी रितसर MBBS चं शिक्षण घेतलं आहे. पण तिथं काही फार त्यांचे मन रमले नाही तेव्हा त्यांनी अभिनयक्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आणि तिथेही उत्तम बस्तान बसवलं. अर्थात त्यांच्या राजकीय एन्ट्रीनं त्यांचे अनेक चाहते नाराज झाले होते खरं पण राजकारणातही कोल्हेंनी नाणं खणखणीत वाजवल्यावंर चाहते सुखावले.



अर्थात डॉ.अमोल कोल्हे भले राजकीय नेता असले तरी आजही सिनेमात काम करणं असो किंवा सिनेनिर्मिती करणं असो की मालिकेची निर्मिती करणं असो ते अजूनही मनोरंजनसृष्टीत तितकेच सक्रिय आहेत.डॉ. अमोल कोल्हेंनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत साकारलेल्या जवळपास सगळ्याच ऐतिहासिक भूमिका गाजल्या..मग त्यांनी रंगवलेले छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा छत्रपती संभाजी महाराज असोत..प्रत्येक भूमिकेत कोल्हे मात्र चोख उठून दिसले.अर्थात लोकांचे ऐतिहासिक भूमिकेसाठी अधिक फेव्हरेट आहेत ते अमोल कोल्हेच. असो...सध्या मात्र अमोल कोल्हे चर्चेत आहेत ते कुठल्या भूमिकेमुळे नाही ना कुठल्या राजकीय घडामोडीमुळे तर एका वेगळ्याच व्हिडीओमुळे.

काय आहे नेमकं त्या व्हिडीओत,ज्यामुळे अमोल कोल्हे पुन्हा डॉक्टरकी सुरु करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.डॉ. अमोल कोल्हेंचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ते एक्सरे चेक करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मानेला पट्टा बांधलेले अमोल कोल्हे दिसले होते म्हणा. त्यांनी कुठेतरी आपल्या या दुखण्याविषयी म्हटलं देखील होतं. तर आता या व्हिडीओत ते आपलेच एक्सरे चेक करताना दिसत आहेत. याला त्यांनी फनी कॅप्शनही दिलं आहे.अमोल कोल्हे यांनी लिहिलं आहे की,''दुखावलेली मान सांभाळत MBBS मध्ये शिकलेलं काही आठवतंय का याची खात्री करून पाहिली स्वतःचे MRI रिपोर्टस पाहून आता अमोल कोल्हे यांच्या यो पोस्टवरनं बराच गोंधल उडाला आहे. अनेकांना वाटत आहे की डॉक्टर पुन्हा प्रॅक्टिस सुरु करतायत की काय. तसंही राजकारणातही त्यांच्याविषयीच्या अनेक बातम्या कानावर पडतच असतात त्यामुळेच कदाचित व्हिडीओ पाहून लोकांचा गैरसमज होत असावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने