सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आमच्या आशेला अंकूर फुटला; उद्धव ठाकरेंना दुहेरी दिलासा

मुंबईः र्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या नेमणुकीबाबत जाहर केलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशामध्ये लोकशाही जीवंत राहावी, यासाठी आमचा लढा आहे. आमच्या आशेला अंकूर फुटला, अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.निवडणूक आयोगाच्या नेमणुकासुद्धा निवडणुकीने व्हायला पाहिजेत, असं उद्धव ठाकरे धनुष्यबाणाच्या निकालानंतर म्हणाले होते. आयोगाच्या नेमणुकीत सर्वसमावेशकता हवी ही त्यांची मागणी होती. आज घटनापीठाने महत्त्वाचा निकाल देत किमान प्रक्रियाबदल केला आहे.

मुंबई: आता निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सरन्यायाधीश यांची समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार, त्यानंतर आयोगाची निवड होणार. सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते. यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.महत्त्वाचं म्हणजे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याने ठाकरेंना दुसरा दिलासा मिळाला आहे.




काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • निवडणूक आयोगाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दिलासादायक

  • याबद्दल मी सातत्याने भाष्य करत आलो आहे

  • निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया बदलली पाहिजे

  • त्यामुळे हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे

  • याच्यापुढे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, संसदेतले विरोधी पक्षनेते हे निवडणूक आयोगाची नेमणूक करतील

  • आयोगावर किती विश्वास ठेवायचा, हे चित्र आज निर्माण झालं आहे

  • आम्हांला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाहीच

  • आमच्याकडून सदस्यसंख्या आणि प्रतिज्ञापत्र घेऊन द्यायचा तोच निर्णय आयोगाने दिला होता

  • आमचा धावा हा सर्वोच्च न्यायालयात आहे. कोर्टाच्या हे सगळं आता लक्षात आलेलं आहे

  • आमची शेवटची आशा सर्वोच्च न्यायालय असली तरी आज त्या आशेला अंकूर फुटला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने