आज फडणवीसांकडे १०५ आमदार आहेत, पण शेवटी...; नागालँडमध्ये पाठिंब्यावरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

मुंबई:  नागालँडमध्ये विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप एनडीपीपी यांच्या सरकार सत्तेत आलं. यानंतर निवडणूकीत सात जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीने देखील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर बरीच टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे भाजपला नाही. आज देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडे १०५ आमदार आहेत, असे असले तरी फायनल म्हणून एकनाथ शिंदे यांची सही असते असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.



काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक बजेटबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या की, मी बजेट वाचेलेले नाही पण जे बघण्यात आलं त्यात ओवर कमिटमेंट या सरकारने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी लाईन दिली आहे त्याच्या विरोधात हे बजेट आहे.कोणाच्या नावाने योजना देऊ नका ही पंतप्रधान मोदी यांची यांची विनंती असते. पण naamo नाम हे नाव मी जेव्हा वाचलं तेव्हा मला समजलाच नाही, की ही योजना कशी त्यांना आवडणार.एसटी कर्मचाऱ्यांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ज्या एसटी बस मधून तुम्ही डिस्काउंट देत आहात, त्याच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होतो आहे का बघायला पाहिजे. या बजेटमध्ये निधी कुठून येणार हे देखील पाहायला हवे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हसन मुश्रीफ यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या की, नोटीस विरोधकांना पाठवणे हे या देशात नवीन नाही. प्रलोभन दाखवले तर प्रवेश होतो नाहीतर कारवाई होते असेही त्या म्हणाल्या.बारामती लोकसभा मतदारसंघाचा शहरी भागाबाबत आज महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा झाली. आधी अजित पवार हे दर शुक्रवारी पालकमंत्री म्हणून बैठका घायच्ये पण आता ही सिस्टीम बंद झाली आहे. नगरसेवक नाहीत, त्यामुळे इथे येऊन कचरा, पाणी या बाबत आम्हाला येऊन महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करायला लागते आहे असेही खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने