तुमचं व्हॉट्सअॅप कोणी चोरून पाहतंय का? चुकूनही करू नका या 2 गोष्टी

मुंबई: इन्स्टंट मेसेजिंग अप व्हॉट्सअप हे एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमची एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. होय... तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे व्हॉट्सअप चॅट इतरही लोक वाचू शकतात. पण ते कसं?

1. थर्ड पार्टी अप्स

तुम्ही व्हॉट्सअपसाठी कोणतेही थर्ड पार्टी अप वापरता का? जर तुम्ही ते वापरत असाल तर ते अप वापरणं ताबडतोब बंद करा. कारण थर्ड पार्टी अप्स तुमचा पर्सनल डेटा लीक करू शकतात. डेटा लीक झाल्यानंतर तुमचा डेटा चुकीच्या कामासाठी वापरला जाऊ शकतो.स्टिकर्स, कीबोर्ड किंवा इमोजी यांसारख्या गोष्टींसाठी लोक या थर्ड पार्टी अप्सचा वापर करतात. हे अप तुमचा डेटा चोरतात, त्यामुळे कंपनीचे अधिकृत अपच वापरा आणि थर्ड पार्टी अप्स वापरणे टाळा.



2. वेब WhatsApp चेक करा

व्हॉट्सअॅपमध्ये युजर्ससाठी लिंक्ड डिव्हाईस नावाचे एक फीचर आहे, या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप सुरू करू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी मोबाईल आणि कॉम्प्युटर/लॅपटॉपवर WhatsApp वापरू शकता. पण जर समजा तुमच्या नकळत कोणीतरी तुमचं WhatsApp वापरत असेल तर? अशा परिस्थितीत, मोबाइल फोनमध्ये व्हॉट्स अॅप उघडा, उजव्या बाजूला दिसणार्‍या तीन डॉट्स मेनूवर क्लिक करून लिंक केलेल्या डिव्हाइसवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप कुठे आहे सुरू आहे ते दिसेल.जर तुमचे अकाउंट तुमच्या संमतीशिवाय अनेक ठिकाणी उघडले असेल, तर तुम्ही तुमच्या फोनवरूनच सर्व डिव्हाइसेसवरून लॉग आऊट करू शकता. लॉग आउट करण्यासाठी, तुम्हाला ज्या डिव्हाइसवरून लॉग आउट करायचे आहे त्यावर टॅप करावे लागेल, लॉग आउटचा पर्याय आपोआप दिसेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने