गौतमीला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? तृप्ती देसाईं भडकल्या

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणच्या जत्रा-यात्रा चालू झाल्या आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी यात्रे निमित्त किर्तन, तमाशा आयोजित करतात. राज्यात गौतमी पाटीलला प्रचंड प्रतिसाद आहे. तिच्यावर अनेकांनी टीका केल्या तिचा विरोध केला.अशातच प्रसिध्द कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची भर पडली आहे. गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी भाष्य केलं आहे. ते आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे कीर्तन सांगत होते. यावेळी ते म्हणाले गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख आणि आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं विधान इंदुरीकरांनी केलं आहे. आम्ही किर्तनाला पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो.



मात्र गौतमीच्या तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात हाणामारी, राडा होतो. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. असं इंदुरीकर महाराज कीर्तनात म्हणाले होते. त्यानंतर आता गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार इंदुरीकर यांना केला आहे.महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केल्याचा मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे. इंदुरीकर तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो, असा सवाल देसाई यांचा इंदुरीकर यांना केला आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर तृप्ती देसाई यांनी सडकून टीका केली आहे. इंदुरीकर आणि गौतमी पाटील प्रकरणात आता भूमाता ब्रिगेडनेदेखील उडी घेतली आहे.काही दिवसांपूर्वी इंदुरीकर यांनी कीर्तन करताना "आम्हाला ५००० रुपये मानधन द्यायला पैश्याचा उधळण म्हणतात आणि गौतमी पाटीलच्या ३ गाण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात" अशा आशयाचे विधान केले होते. यावर आता अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने