कवेत अंबर घेताना! महिला दिनामागचा हा अनोखा इतिहास अजूनही अनेकांना माहिती नाही

मुंबई: मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती ! शक्ती आणि 'बुध्दी यांच्या संगमाने महिला जयते संस्कृती! कवेत अंबर घेतानाही पाउल तिचे जमिनीवरती !महिला म्हणजे विश्वरूपी बासरीला सूर देणारी श्वासारती। आज ८ मार्च! दरवर्षी ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. भारतातही या महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात. विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ, दरवर्षी आठ मार्च हा दिवस जगभर 'महिला दिन' म्हणून साजरा होऊ लागला. चला, आता जाणून घेऊया महिला दिनामागचा माहित नसलेला इतिहास ! 'नव्या युगात वाहिले वारे स्त्री मुक्तीचे ! संघर्ष पदोपदी केला अन् मिळविले जे न्याय्य हक्काचे !!.

हर क्षेत्रात स्थान मिळविले अव्वल दर्जाचे ! स्त्रीचा सन्मान करणे हेच खरे लक्षण पुरुषार्थाचे !? पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री- एक उदाहरण म्हणजे जगभरच्या स्त्रियांना शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता आणि या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.दि. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून निश्चित करण्यात आला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली त्यामध्ये क्लारा झेटकिन' या अतिशय लढाऊ बाण्याच्या झुंजार कम्युनिस्ट • कार्यकर्तीने "सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे" अशी घोषणा केली.

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासाचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री- पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरदारपणे केली अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. त्यानंतर १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या समाजवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा 'जागतिक महिला 'दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला.क्लाराने जो ठराव मांडला तो पास झाला. या ठरावानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्याचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये आणि १९१९ मध्ये अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. यापुढे जगभरात हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून साजरा होऊ लागला.भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनाना बळकटी आली. स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या. आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे.

व्यापलीस व सर्व क्षेत्रे गाठलीस शिखरे यशाची !

कर्तव्यास सदा राहून तत्पर लेक शोभसी जिजाऊ, सावित्रीची!

खरच आजचा दिवस हा प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आणि तो असणारच! कारण आज अनेक कर्तृलवान महिलांच्या कार्याची दखल घेतली जाऊन त्या सन्मानित केल्या जाणार आहेत.

गगन ही ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखाखाली. विश्व ते सारे विसावे !".".

स्त्री ही गृहिणी असो वा नोकरी करणारी असो. ती आपल्या सर्व जबाबदाऱ्या लीलया व शिताफीने पेलत असते. स्त्रीविना घराला घरपण नसते. ज्या घरात स्त्री नाही ते घर, घर असल्या सारखं वाटत नाही, स्त्री मध्ये घराला जोडून ठेवण्याची अनोखी शक्ती असते. ती नेहमी आपल्या कुटुंबासाठीच जगत असते म्हणूनच आजचा हा एक दिवस फक्त तिच्यासाठी.. फक्त तिच्यासाठी



अगं एक दिवस तर साजरा कर

स्वतःच्या अस्तित्वाचा तू

'निळ्या आकाशात घेऊन उंच भरारी रोशन कर दुनिया सारी फिरून

पाहू नकोस माधारी

तुझ्यात सामावली आहे शक्ती भारी,

तूच आहेस सबला नारी

अपत्यांना जन्म देण्याचे कारण तू, नात्यामधली मायेची गुंफण तू

आजच्या युगाची भविष्य युवा प्रगतीस समयी माता तू !

आपल्या देशाच्या इतिहासातही अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रे वाचायला मिळतात उदाहरणार्थ जिजाबाई. झाशीची राणी इ. त्याचप्रमाणे अलिकडच्या काळातील इंदिरा गांधी यांच्या मुत्सद्दीपणाचे उदाहरण दिले जाते. आपल्याकडे स्त्री ची देवी म्हणून पूजा करतात तसेच सीतामाई, सावित्री, अहिल्या, उर्मिला, पतीव्रता स्त्रीची उदाहरणे धर्मग्रंथात पहायला मिळतात.खरच, स्त्री ही एक अमर्याद शक्ती आहे. एकदा एका लहानशा नातीने आपल्या आजीला प्रश्न विचारला, काय गं आजी, हे स्त्री शक्ती म्हणजे नेमके काय असते ? मी वाचते, टी.व्ही वर ऐकते " स्त्री सबलीकरण काय गं आजी ?" नारी शक्ती म्हणजे नेमके कितीतरीसुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांनं त्या आजीनी नातीला दिलेले उत्तर अतिशय समर्पक होते. ती आजी आपल्या नातीला म्हणते "अगं, स्त्री म्हणजे काय ? स्त्री म्हणजे काही वेगळे नसते. ती पुढे म्हणते, स्त्री सुध्दा एक मनुष्य असते तिला पण तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते डिवचली तर वाघिण असते.

स्त्री तान्हया बाळाची नीज असते कडाडली तर वीज असते. अन् बरं का पोरी, तिच्याच 'गर्भात साऱ्या देशाचं भविष्याचे बीज असते. स्त्री म्हणजे एक शक्ती असते"पुरातन काळापासून म्हणजे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर श्री आदिनाथ भगवान यांच्या, सर्व कला व विद्या यामध्ये पारंगत असणाऱ्या कन्या बाहमी' आणि 'सुंदरी' या विदुषींचा उल्लेख ही सापडतो. पूर्वीपासून स्त्रीला सन्माननीय वागणूक मिळत असली तरी त्यात पुरुषप्रधान संस्कृती जाणवत होती. आजच्या स्त्रिला एक देवी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून वागणूक हवी आहे,आज स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. पेपर वाचायला घेतला की बऱ्याच बातम्या लक्ष वेधून लता मंगेशकर यांना 'भारतरत्न', सुनिता विल्यम्सचे धाडस या गोष्टी आठवल्या की बळ येतं.अवकाशातील यशस्वी पदार्पण, मेरी कोमला गोल्ड मेडल, सुधा मूर्ती एक यशस्सी उद्योजिका या आणि अने अशा अनेक !बातमी दिसते हुंड्यासाठी विवाहितेची हत्या, स्त्रीवर सामूहिक बलात्कार, भ्रूणहत्या या अशा बातम्या एकाच दिवशी वाचल्या की आपल्याला प्रश्न पडतो की आजच्या युगात महिलांचे नक्की स्थान काय ? जर स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात मागे नसतील तर त्यांच्यावरील अत्याचार कमी न होता वाढत का गेले? मुलगी जन्माला आली की आजही वाईट वाटते. जन्माला यायच्या आधीपासूनच मुलीचा दुस्वास सुरू होतो. सुरुवात डोहाळे जेवणापासून होते.

ज्या स्त्रिला मुलगा आहे तीच गरोदर स्त्रीची ओटी भरेल जेणेकरून तिला मुलगा व्हावा. या गोष्टीला काहीही वैज्ञानिक आधार नाही. पहिल्यांदा मुलगी झाली तर सहजपणे स्वीकारतात परंतु दुसऱ्यांदा मुलगी झाली की जन्म देणाऱ्या मातेच्याही मनात हाच पहिला प्रश्न येतो की, मुलगा झाला असता तर बरं झालं असतं. काही ठिकाणी तर दुसरी मुलगी असली तर भृणहत्या करतात. आजही कित्येक कमावत्या स्त्रीला सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य नाही. आज काळ बदलतोय. काही अशा स्त्रिया स्वतंत्र झाल्या आहेत. ग्रामीण भागात आजही स्त्री अनेक क्षेत्रात मागेच आहे. कुणाचा पाठिंबा मिळो न मिळो स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करायला हवा.स्त्री आदिमाया असो, महाकाली असो, अर्धांगिनी असो. प्रत्येक वेळी समाजाने तिचे अस्तित्व दुय्यम ठरवले. चूल व मूल इतक तिला मर्यादित करताना तिचे शोषण केले. समाजात पुरुषांच्या बरोबरीने तिचे स्थान नाकारण्यात आले. रूढी-परंपराचा पुरस्कार करणाऱ्या - समाजाने हुंडा, सती, विधवाना मरण यातना या गोष्टीत तिला जखडून टाक‌ले. पुरुषी अहंकाराने तिला परंपरेच्या बेड्यांमध्ये बंदिस्त केले.मग सुरू झाला स्त्री समानतेचा संघर्ष ! समानतेची तरतूद 'झाली. स्त्रियांना ५० टक्के आरक्षण मिळाले. स्त्रिया निवडणुका लढवू लागल्या." स्त्री घराबाहेर पडली. बस कंडक्टर झाली. अंतराळवीर बनली. सर्व परीक्षांच्या गुणवत्ता यादीत चमकू लागली. प्रत्येक क्षेत्रात स्वतःची प्रगती केली. आज प्रत्येक शाळेत पहिल्या दहा मध्ये येणाऱ्या सर्व मुली असतात. 

आधुनिक स्त्री म्हणजेच २१ व्या शतकाया 'तील स्त्री ही कुणापेक्षाही कमी नाही. परंतु आजही स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. मोहिमा चालवाव्या लागतात. - तिच्या या प्रयत्नामध्ये तिचा उद्याचा प्रवास दडलेला आहे. करिअ शिक्षण, कुटुंब यांच्या पलीकडे जाऊन तिला तिचं अस्तित्व ठरवायचं आहे. स्वतःच्या पायावर ती कधीच उभी राहिली आहे. आता तिला पुरुषी मानसिकता समूळ उपटून फेकायची आहे. पुरुषांच्या विश्वात तिला बरोबरीची जागा मिळाली तर खऱ्या अर्थाने स्त्री समानता झाली असे म्हणता येईल. आणि एक नवीन संस्कृती उदयाला येईल. ही नवीन संस्कृती उदयाला आणू पाहणाऱ्या आपल्या सर्व माता-भगिनींना व त्यांच्यातील स्त्री शक्तीला आजच्या महिला दिनी मानाचा मुजरा! म्हणतात ना..

" हजारों फूल चाहिए, एक माला बनाने के लिए

हजारो बूँद चाहिए, समुद्र बनानेने लिए

पर एक महिला अकेली ही काफी है, संसार में परिवर्तन लाने के लिए

मनात आणले तर ती उन्नतिच्या शिखरावर चढून कर्तृत्वाचा ध्वज फडकवू शकते. शेवटी इतके सांगावे वाटते -

आजच्या युगाची प्रगती तू, उन्नती तू विधातू, सरस्वती तू

शक्ती

अर्धांगिनी तू,

कीर्ती तू

प्रेमाची परिभाषा

कुलवधू तू, गृहस्वामिनी तू

विश्वास तू,

कल्पना, माता तू, भक्ती तू

तू कित्येक रूपे तुझी असती, त्यात प्रेमाचा, कळस तू

प्राणवायू कुटुंबा देशी, देशी, तीच मंगल तुळस तू !!. जागतिक महिला दिनाच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा !

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने