ग्रीसमध्येही खेळली जाते होळी, पण भारतासारखी रंगांनी नाही तर...

ग्रीस: भारताप्रमाणे ग्रीसमध्येपण होळी खेळण्याची प्रथा आहे. पण भारतात आपण होळी रंगाने खेळतो. पण ग्रीसमध्ये होळीप्रमाणे रंगीत पीठाने खेळलं जातं. ज्याला तिथे फ्लोअर वॉर म्हटलं जातं. यावेळी ते लोक एकमेकांवर रंगीत पीठ फेकतात. ज्यामुळे सगळीकडे पीठच पीठ होतं. हा उत्सव एथेंसपासून पश्चिमेकडे २०० किलोमीटर दूर असलेल्या गॅलेक्सीडमध्ये साजरा केला जातो. हे मासेमारांचं शहर आहे. या शहराची लोकसंख्या फक्त १७०० आहे. इथे प्रसिद्ध व्यापारी बंदर आहे.हे फ्लोअर वॉर भारतीय होळीपेक्षा वेगळं असलं तरी इथेही लोक हा उत्सव फार उत्साहाने साजरा करतात. हा उत्सव ख्रिश्चन लोकांच्या ४० दिवसाची सुरुवात आणि कार्निवल सीजनच्या शेवटी साजरा केली जातो. कोविडमुळे मागील २ वर्षांपासून उत्सव रद्द केला जात आहे. त्यामुळे यंदा याचा उत्साह वेगळाच असणार आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी पर्यटकही दूरदूरून सहभागी होतात.



फ्लोअर वॉर ही परंपरा १८०१ मध्ये ऑटोमन साम्राज्याच्या विरोधाचं प्रतिक म्हणून सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्याने त्यावेळी ग्रीसवर राज्य केलं होतं आणि या कार्निव्हलला विरोध केला होता. ग्रीसच्या काही नागरिकांच्या नुसार या परंपरेला निभवण्याचा अर्थ सध्या चालू असलेल्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशातल्या लोकांना शांती पोहचवण आहे. असं सांगितलं जातं की, ऑटोमन राजाने लोकांना उत्सव साजरा करण्याला बंदी घातली होती. या आदेशाचा विरोध करण्यासाठी लोक आपल्या चेहऱ्यावर राक लावून रस्त्यावर नाचायला लागले होते.जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आणि कारणांनी रंगांचा उत्सव साजरा केला जातो. जसं, न्युझीलँडचा वानाका उत्सवात पेंटींग केलं जातं. थायलंडच्या सोंगकरन उत्सवात पाण्याने जोरदार खेळलं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने