ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांचं भारतात जंगी स्वागत.. विमानतळावर लोकांनी..

 मुंबई: जगाचे लक्ष लागलेला 'ऑस्कर' सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात भारताने दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले. यामध्ये 'आरआरआर' चित्रपटाच्या 'नाटूनाटू' गाण्याला आणि 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंटरी ला ऑस्कर मिळाला. या विजयाने भारताची मान चांगलीच उंचावली. भारतीयांनी मोठा जल्लोष केला.हाच जल्लोष विमान तळावरही पाहायला मिळाला. कारण 'द एलिफंट विस्परर्स'ची टीम ऑस्कर जिंकून भारतात परतली आणि मुंबई विमानतळावर त्यांचे दमदार स्वागत झाले.



ऑस्कर-2023 (Oscar 2023) या सोहळ्यात 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या भारतीय माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार जिंकला. या डॉक्युमेंट्रीमध्ये हत्ती आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या दाम्पत्याची गोष्ट सांगण्यात आली आहे.या डॉक्युमेंट्रीची निर्मिती गुनीत मोंगा(Guneet Monga) यांनी केली असून दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केलं आहे. कार्तिकी आणि गुनीत यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर जाऊन ऑस्करची ट्रॉफी स्विकारली. यावेळी दोन महिलांनी हा ऑस्कर जिंकला असेही त्यांचे कौतुक केले गेले.

त्यांतर गुनीत मोंगा ऑस्करची ट्रॉफी घेऊन भारतात परतल्या. गुनीत या शुक्रवारी 17 मार्च रोजी पहाटे लॉस एंजेलिसहून मुंबई विमानतळावर उतरल्या. यावेळी गुनीत यांचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गुनीत यांचे पती सनी कपूर हे देखील स्वागतासाठी विमानतळावर आले होते.यावेळी अनेकांनी गुनीतच्या गळ्यात फुलांचे हार घातले तर कुणी औक्षण केले. गुनीत यांच्या हातात ऑस्करची ट्रॉफी होती आणि त्या प्रचंड आनंदात होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने