जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत घोडदौड

नवी दिल्ली : भारतीय महिला खेळाडूंची नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेतील दमदार कामगिरी रविवारीही कायम राहिली. स्टार खेळाडू निखत झरीन व मनीषा माऊन या दोघींनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत पुढल्या फेरीत प्रवेश केला.गत जागतिक विजेती निखतच्या आक्रमक खेळासमोर अल्जेरियाची अव्वल मानांकित बाऊलम राऊमायसा हिचा निभाव लागला नाही. निखत हिने ५० किलो वजनी गटात राऊमायसा हिच्यावर ५-० असा विजय साकारला. निखतसमोर पुढील फेरीत मेक्सिकोच्या हिरेरा अल्वारेझ फातिमा हिचे आव्हान असणार आहे.निखतप्रमाणेच मनीषा हिनेही प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व गाजवले. मनीषा हिने ५७ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या टीना रहिमी हिच्यावर ५-० असा सहज विजय नोंदवला. हरियानाच्या २५ वर्षीय खेळाडूने २०२२ मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावले होते. आता पुढील फेरीत तिला तुर्कीच्या नूर तूरहान हिचा सामना करावा लागणार आहे.



ऑलिंपिक पदकविजेत्यांची वाटचाल

ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूंनीही रविवारी पुढे वाटचाल केली. २०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारी कोलंबियाची इनग्रीत वॅलेंसिया हिने ५० किलो वजनी गटात केनियाच्या नझीवा वॅरोनिका हिला पराभूत केले.रेफ्रींकडून ही लढत थांबवण्यात (रेफ्री स्टॉप कॉनटेस्ट) आली. वॅलेंसियाच्या अनुभवी व आक्रमक खेळापुढे केनियन खेळाडू तग धरू शकली नाही. आणखी एक ऑलिंपिक पदकविजेती इटलीची खेळाडू आयरमा टेस्टा हिने ग्वाटेमालाच्या रेयेस मोरेनो नोशबेट हिला ४-१ असे नमवले व पुढे पाऊल टाकले.

भारतीय खेळाडूंच्या

आजच्या लढती

लवलीना बोर्गोहेन

(७५ किलो वजनी गट)

साक्षी चौधरी

(५२ किलो वजनी गट)

प्रीती (५४ किलो वजनी गट)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने