एका घोटात पोपटासारखे बोलायला लावणाऱ्या बियरचा शोध महिलांनी लावलाय?

मुंबई: एखाद्याच्या पोटात दोन घोट गेलं की तो माणूस झुलायला लागतो. त्याची नशा अशी चढते की समोरच्याला आपण आपली सगळी संपत्तीसुद्धा लिहून देऊ शकतो. तसेच, एखाद्याकडून काही वधवून घ्यायचे असेल तर त्यातही बिअर मदत करते. बिअरचा एक ग्लास घेतल्यानंतर समोरील व्यक्ती पोपटासारखी बोलायला लागते. अशा ही बिअर महिला बनवत होत्या असे कोणी म्हटले तर तूम्हाला पटेल का?रोज दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्याला वठणीवर आणायचं काम महिला करतात. गावा-गावात दारूबंदीची चळवळ उभारून गाव सुधारण्याचं कामही महिलाच करतात. महिलांनी ठरवलं तर त्यांना अशक्य असं काहीच नाही. गाव सुधरावा, गावातली तरूण पोरं दारूच्या विळख्यातून सुटावीत यासाठी पुढाकार घेतात. पण, कधीकाळी महिलाच हे पेय असलेल्या बिअर बनवत होत्या.



इतिहासतज्ञ जेन पेटोन यांनी केलेल्या संशोधनानूसार सर्वप्रथम बियर तयार केली ती विकली व प्यायली ती मेसोपोटेमिअन स्त्रियांनीच. नक्की कोणत्या व्यक्तीने बिअरचा शोध लावला हे अज्ञात आहे. परंतु स्त्रियांनीच हा शोध लावला यावर पेटोन ठाम आहेत.एवढेच नाही तर, त्या काळात बियर तयार करण्याचा वा दारूभट्टी चालवण्याचा अधिकार फक्त स्त्रियांनाच होता. तेही ७००० वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमिया आणि सुमेरियामध्ये. सुमेरिया इथे सापडलेले पुरावे बियरच्या अस्तित्त्वाबद्दलचे सर्वात जुने पुरावे मानले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे तिथे त्यावेळच्या बियर बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल सुद्धा माहिती मिळाली आहे.

बीअर बनवण्यासाठी साखर आणि किण्वन आंबवले जातात. यानंतर त्यात हॉप्स फ्लेवर्स आणि नैसर्गिक संरक्षक जोडले जातात. अशा प्रकारे कार्बोनेशन होते, ज्याद्वारे बिअर तयार होते.इंग्लंडमध्ये सुद्धा महिला बियर बनवत असल्याचे पुरावे सापडतात. तिथे फार पूर्वी महिला आपल्या कुटुंबासाठी बियर बनवत. कालांतराने त्या उरलेली बियर विकू लागल्या. हळूहळू त्यात बदल होत त्या अधिकची बियर निर्मिती करू लागल्या. ही बियर विकून अनेक स्त्रिया कुटुंब चालवत असत.तर बिअर कशी बनवायची याची रेसिपीही महिलांकडेच होती, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.बियरची निर्मिती आणि विक्री महिलाच करत होत्या याचे असेच अनेक पुरावे संशोधकांनी शोधून काढले आहेत.बियरचा शोध महिलांनीच लावला यावर जवळपास सर्वांचे एकमतही झालेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने