नाटू नाटूला 'ऑस्कर' मिळालं! RRR च्या राजमौलींनी रचला इतिहास

मुंबई:  माम भारतीय प्रेक्षकांच्या, चाहत्यांसाठी अभिमानाची गोष्ट आत घडली आहे. ज्या क्षणाकडे भारतीय डोळे लावून बसले होते तो सुवर्णक्षण याची देही याची डोळा लाखो जणांनी अनुभवला आहे. एस एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआऱ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.अँड ऑस्कर गोज टू....हे वाक्य उच्चारलं गेलं आणि समस्त भारतीयांच्या हदयाची धडधड वाढली होती. काय होणार, नाटू नाटू ला ऑस्कर मिळणार का, गेल्या काही महिन्यांपासून ज्याकडे सगळे लक्ष ठेवून होते तो क्षण अखेर समीप आला आणि त्या क्षणानं साऱ्यांना आनंदित करुन टाकले. आरआरआऱच्या टीमनं जेव्हा तो ऑस्कर स्विकारला त्यावेळच्या मुद्रा खूप काही सांगून जाणाऱ्या होत्या. त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नव्हते.



राजामौली यांच्या आरआरआऱ चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला 'बेस्ट ओरिजनल साँग' कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले होते. त्याच्या शर्यतीत तगडे स्पर्धक होते. त्यात हॉलीवूडच्या लोकप्रिय चित्रपटांचाही समावेश होता. अशावेळी नाटू नाटूला ऑस्कर मिळणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागले होते. चित्रपट विश्वात सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ऑस्कर हा भारतीय चित्रपट आरआरआरच्या एका गाण्याला मिळाला याचा आनंद गगनात न मानवणारा आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. त्यात 'नाटू नाटू' गाण्याला नामांकन मिळालं. अशातच अकादमीने दुसरी आनंदाची बातमी ट्विट करत शेयर केली होती.अॅकडमी थिटएरमध्ये पार पडलेल्या त्या सोहळ्याला जगभरातील नामवंत कलावंत उपस्थित होते. त्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला ऑस्करचं मिळालेलं निमंत्रण, तिची इंट्री हे सारं भारतीय प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद होतं. दीपिकाच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. आरआरआरला ऑस्कर मिळताच आता देशभरातील चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होतो आहे. कित्येक सेलिब्रेटींनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

२८ फेब्रुवारी रोजी अकादमीने नाटू नाटूच्या नॉमिनेशन संदर्भात ट्विट करत यादसंदर्भात घोषणा केली होती. ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. “राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ‘नाटू नाटू’ ९५ व्या अकादमी पुरस्कारात लाइव्ह,” असं या ट्विट मध्ये म्हटलं होतं.नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार संगीतकार एमएम कीरावानी असून या गाण्यातील अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी जे नृत्य केले आहे त्याचे सगळीकडे कौतूक होताना दिसते आहे. सोशल मीडियावर तर नाटू नाटू च्या रिल्सनं धुमाकूळ घातला होता. केवळ बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडमधील कित्येक कलावंतांनी त्या दोघांचे कौतूक केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने