कियाराचे ठुमके अन् शंकर महादेवन यांचा सूर, WPL च्या पहिल्याच हंगामाला लागणार चार चांद

मुंबई: बीसीसीआय आपली पहिली वहिली महिला प्रीमीयर लीग (Women's Premier League) ग्रँड करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीये. 4 मार्चापासून मुंबईत सुरू होणाऱ्या WPL च्या पहिल्याच हंगामात उद्घाटन सोहळ्यात स्टार्सची वर्णी लागणार आहे. बॉलीवूड स्टार कियारा अडवणी आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन दोघेही उद्घाटन सोहळ्याला चार चांद लावणार आहेत.बीसीसीआयने याबाबत अजून घोषणा केलेली नाही. बीसीसीआय WPL लीगच्या पहिल्या हंगामाचा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य करण्याचे ठरवले आहे. यामुळे डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यापूर्वी आघाडीचे सेलेब्रेटी उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावतील.



पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार नुकतची विवाहबद्ध झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी ही आपल्या गाण्यांवर WPL च्या उद्घाटन सोहळ्यात चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. मात्र बीसीसीआयन WPL सामन्यांच्या तिकीटाबाबत अजून माहिती प्रसिद्ध केलेली नाही. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या उद्घाटन सोहळा आणि पहिला सामना पाहण्यासाठी किती तिकीट आहे हे अजून उघड केलेले नाही.बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नुकतेच WPL ची अधिकृत धून प्रसिद्ध केली. मिळालेल्या माहितीनुसार शंकर महादेवन हे WPL चे अँथम साँग गाणार आहेत. शंकर महादेवन यांनीच हे गाणे कंपोज केले असून उद्घाटन सोहळ्यावेळी हे अँथम साँग रिलीज केले जाईल.वुमन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम हा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने