सिसोदियांच्या ट्विटनं उडाली खळबळं! भाजपचं आकांडतांडव

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारु घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुगांत न्यायालयीन कोठडीत आहेत, असं असताना त्यांनी काल होळीनिमित्त एक ट्विट केल्यानं खळबळ उडाली आहे. यावरुन भाजपनं त्यांच्यावर निशाणा साधला असून सिसोदिया तुरुंगात मोबाईल कसे काय वापरत आहेत? असा सावल करत आकांडतांडव केलं आहे.

सिसोदियांनी काय केलं होतं ट्विट?

सिसोदिया यांनी ८ मार्च रोजी ट्विट केलं होतं की, आत्तापर्यंत ऐकलं होतं की देशात शाळा सुरु होतात तेव्हा तुरुंग बंद होतात. पण आता या लोकांनी तर देशात शाळा सुरु करणाऱ्यांनाच तुरुंगात बंद करणं सुरु केलं आहे.



सिसोदियांच्या या ट्विटला भाजपचं उत्तर

भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी सिसोदियांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं की, तुरुंगात मनिष सिसोदिया यांच्याकडं फोन आहे का? कारण २६ फेब्रुवारीला सीबीआनं ताब्यात घेतल्यानंतर आत्तापर्यंत सिसोदिया यांनी एकही ट्विट केलं नव्हतं. यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन होळीच्या दिवशी संध्याकाळी पहिल्यांदाच ट्विट करण्यात आलं. यामुळं राजकीय गदारोळ माजला आहे.सिसोदियांच्या ट्विटमुळं भाजपनं त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पण सिसोदियांचं हे ट्विटर हँडल त्यांची सोशल मीडिया टीम किंवा त्यांची पत्नी हाताळत असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्हीपैंकी कोणी एकानं हे ट्विट करण्यात आलं आहे. पण यावर आम आदमी पार्टीकडून अद्याप कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने