राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणार घर? भाजप नेत्याची प्रशासनाकडे मागणी

नवी दिल्ली:  छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या ८५ व्या सर्वसाधारण अधिवेशनात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते, 'माझे वय ५२ वर्षे आहे, पण माझ्याकडे राहण्यासाठी अजूनही घर नाही. छत्तीसगडमधील बेमेतरा येथील भाजप नेते देवदास चतुर्वेदी यांनी यासंदर्भात प्रशासनाला पत्र लिहिले आहे.देवदास यांनी आपल्या पत्रात राहुल गांधी यांना सरकारी जमीन देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. असे केल्याने राहुल गांधींसारख्या गरीबालाही पक्के घर मिळेल आणि राहुल गांधी यांचे घराचे स्वप्नही पूर्ण होईल. तसेच पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजना देखील पूर्ण होईल. प्रशासनाला सादर केलेल्या पत्राची प्रत आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.



देवदास चतुर्वेदी हे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आणि नवागड जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि वायनाडचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 24, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी छत्तीसगडचा दौरा केला होता. जिथे त्यांनी आपल्या भाषणात आपले वय ५२ वर्षे असल्याचे सांगितले. स्वत:चे पक्के घर नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने