'माझ्याकडून ‘तो’ शब्द चुकलाच म्हणत', अमोल कोल्हेंनी व्यक्त केली दिलगिरी

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे बेळगावी असा उल्लेख केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. घाई गडबडीत आणि अनावधानानं बेळगावचा बेळगावी असा उल्लेख केला, असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला आहे.एका नियोजित कार्यक्रमात संदर्भात प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे यांनी बेळगावी असा उल्लेख केला होता. बेळगावी उल्लेखावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने खासदार अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठवली होती. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमा भागातील संतप्त प्रतिक्रियांनंतर खासदार कोल्हे यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.यासंबधीचा एक व्हिडिओ खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरती शेअर केला आहे. "येत्या पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, असं मला सांगण्यात आलं आहे, 



म्हणून या कार्यक्रमाला मी येत होतो, परंतु या कार्यक्रमाच्या संदर्भात आता निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना घाईमध्ये, अनावधानाने या प्रोगॅमसंदर्भात भाष्य करत असताना, बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला, याबद्दल मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील, त्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माझी काय भूमिका आहे, ते आजतागायत सर्वांना माहिती आहे. मी आजही त्या भूमिकेवर ठाम आहे.""आपल्या सीमाभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहतोय, म्हणून केवळ या कार्यक्रमाला येण्याचं मी कबूल केलं होतं. यामध्ये बेळगावचा माझ्याकडून जो माझ्याकडून अनावधानाने, घाईमध्ये चुकीचा उल्लेख झाला. त्याबद्दल मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या भावना दुखावल्यात्याबद्दल सर्वांची माफी मागतो," असे कोल्हे म्हणाले.

"जय शिवराय, बेळगाव येथे राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण होतं म्हणून मला या कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु माझ्या अनेक सीमाभागातील बांधवांनी, अनेक हितचिंतकांनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागच्या पार्श्वभूमीची मला कल्पना करून दिली. त्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी माझ्याकडून अनावधानाने बेळगावचा चुकीचा उल्लेख झाला. त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे.पुढे ते म्हणतात की, मी माझ्या सीमाभागातील बांधवांबरोबर ठामपणे उभा आहे. त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या आग्रही मागणीवरून 5 तारखेचा बेळगाव मधल्या राजहंस गडावरच्या माझा येण्याचा कार्यक्रम मी रद्द करतो. या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. तुमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्याबरोबरच मी ठामपणे उभा आहे. त्याविषयी विश्वास बाळगा असं त्यांनी म्हंटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने