शिंदेंच्या काही मंत्र्यांना सावरकरांची विचारधारा पटत नाही का? सोशल मीडियावर चर्चा

मुंबई: राज्यात सध्या राहुल गांधी आणि त्यांनी सावरकरांविषयी केलेल्या विधानावरुन वातावरण तापलेलं आहे. भाजपा आणि शिंदे गटाने सोशल मीडियासह गल्लीबोळातून सावरकरांच्या समर्थनार्थ मोहीम राबवली आहे. पण काही मंत्री या मोहिमेपासून अलिप्त राहत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सावरकर गौरव यात्रा काढण्याचं फर्मान काढलं.



 त्यानंतर भाजपा तसंच शिंदे गटातल्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलून आम्ही सावरकर, मी सावरकर असे डीपी ठेवले.मात्र शिंदेंच्या शिवसेनेतल्या तीन मंत्र्यांनी अजूनही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे डिपी, स्टेटस बदलले नसल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, तसंच अन्न वऔषध मंत्री संजय राठोड यांनी आपले डीपी बदलले नाहीत. त्यामुळे ही चर्चा रंगली आहे.या मंत्र्यांना सावरकरांची विचारधारा पटलेली नाही की काय, असंही काही जण बोलू लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने