ठाकरेंचं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी 'हा' पक्ष बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार होता, पण...

मुंबई:  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपाशी युती केली. राज्यात शिंदे भाजप सरकार देखील स्थापन झालं. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पाय उतार व्हायला लागलं होतं.वारंवार एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी बंडचं कारण राष्ट्रवादी-काँग्रेस असल्याचं सांगत होते. मात्र काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.



अशोक चव्हाण एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मविआ सरकार कोसळत होतं त्यावेळीचा एक किस्सा सांगितला ते म्हणाले, ज्यावेळ सरकार कोसळत होतं, त्यावेळी काही लोकांनी उल्लेख केला की काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून चाललो आहे, त्यानंतर उद्धवजी राजीनामा देण्यासाठी जात होते त्यावेळी मी त्यांना सांगितलं आमची भूमिका स्पष्ट आहे.जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेस पक्ष तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल पण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिलं पाहिजे, तुम्ही तुमचा कार्यकाळ पाच वर्ष पुर्ण केला पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली.

तर पुढं म्हणाले की, मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं मी देखील मुख्यमंत्री राहिलो पण असा उद्धवजीं सारखा मुख्यमंत्री होणे नाही असं मी जाहीर पणे सांगतो असं म्हणत चव्हाणांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं.दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळलं असलं तरी दखील मविआ आघाडी मजबुत ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र सभा घेत आहेत. वज्रमूठ सभेतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात सभा घेत आहेत. आणि पुढील काळात देखील मोठ्या जाहीर सभेंचे नियोजन चालू आहे. दरम्यान १मे रोजी मविआ मुंबईत वज्रमूठ सभा घेणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने