डोकेदुखीवर Instant Relief हवाय तर गोळी नको हे उपाय करा!

मुंबई: डोकेदुखी हा असा आजार आहे जो तुम्हाला कधीही कुठेही आमंत्रण न देता भेटायला येऊ शकतो. या आजाराची अनेक कारणं आहेत. अगदी सतत मोबाईल घेऊन बसलात तरी डोकं दुखू शकतं. तर, काहीवेळा शिळ अन्न खाऊनही डोकं दुखतं. तर याची गंभीर कारण हे सतत घेतलेला ताण तणाव आणि मानसिक आजार होय. तुम्ही या आजारांवर काही घरगुती उपायांनी आराम मिळवू शकता. कारण, डोकेदुखीवर सतत गोळ्या,औषधे घेणं हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे घरातले हे उपाय करून डोकेदुखीला रामराम करा.

पाणी

कडक उन्हाळ्यात प्रवासामुळे डोकं दुखत असेल. तर, त्याचे कारण हे शरीर डिहायड्रेड होणं हे असू शकतं. त्यामुळे शरीराला पुरेसं पाणी दिवसभरात प्यायलं पाहिजे.  त्यामुळे डोकेदुखी थांबू शकते.

 लवंग

डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.



आलेयुक्त चहा

अनेकांना आलं घालून केलेला चहा प्रचंड आवडतो. विशेष म्हणजे हा चहा केवळ चवीसोबतच आरोग्यासाठीदेखील तितकाच फायदेशीर आहे.आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते.

अॅक्युप्रेशर करा

अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.

लिंबू पाणी

शरीरातील आम्लांचे प्रमाण कमी जास्त झाल्यावर डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे डोक दुखायला लागल्यावर लिंबू पाणी प्यावं. यात थोडंसं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालावा.

कलिंगड खा

डोक दुखायला लागल्यावर पाणीदार फळे खा. यात कलिंगड, द्राक्षे, खरबूज अशा फळांचा समावेश असावा. पण शक्यतो कलिंगड खावं.कलिंगडात नैसर्गिकरित्या पाण्याचा मुबलक प्रमाण असतं. त्यामुळे जर शरीर डिहायड्रेड झालं असेल तर कलिंगडामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची पातळी स्थिर होण्यास मदत मिळते.

स्ट्रेच करून पहा

बऱ्याच वेळा नसा किंवा स्नायूंवर ताण आला की डोकं दुखू लागतं. यात काही वेळा पाठीचा वरचा भाग, मान, खांदे यांच्यावर ताण पडल्याने डोकं दुखतं. त्यामुळे डोकं दुखायला लागल्यावर मानेचं स्ट्रेचिंग करुन पाहावं. यात मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात.

बर्फाचा शेक

अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने