देशात 24 तासांत 6 हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित!

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून यामध्ये चोवीस तासांत नव्या ६१५५ रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागानं याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केली असून याचे आकडे चिंतेत भर टाकत आहेत.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेसमध्ये गेल्या चोवीस तासांत ६,१५५ नव्या रुग्णांची भर पडली असून यामुळं देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१,१९४ हजारांवर पोहोचली आहे. सध्या दररोजचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.६३ टक्क्यांवर आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने