गुजरात टायटन्सला धक्का; हार्दीक पांड्यावर दंडात्मक कारवाई

मुंबई: गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्यावर आयपीएलने दंडात्मक कारवाई केली  आहे. काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्सने विजय मिळवला पण आयपीएलने संघाला मोठा धक्का दिला आहे.पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल आयपीएलच्या आचारसंहितेनुसार हार्दिक पांड्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबद्दल आयपीएलने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.



गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला १३ एप्रिल 2023 रोजी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यादरम्यान त्याच्या संघाने षटकांची गती कमी राखण्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गती कमी राखण्याबाबतची ही संघाची या हंगामातील पहिली चूक होती. त्यामुळे पांड्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.यापूर्वी, षटकांची गती कमी राखल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यावरही 12 लाखांची दंडाची कारवाई झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने