पठ्ठ्या दहाव्या वर्षी पास झाला दहावीची परीक्षा! घडवला इतिहास

लखनऊ : कमी वयात अनेक अचाट कामं करणारी अनेक मुलांबाबत आपण ऐकलं-वाचलं असेल. पण कमी वयात पुढच्या वर्गातील कठीण अभ्यासक्रमाची परीक्षा देणारे निराळेच. त्यात आता अयान गोयल नामक नोयडातील मुलाची भर पडली आहे. या दहा वर्षांच्या पठ्ठ्यानं चक्क दहावीची परीक्षा विशेष प्राविण्यानं पास केली आहे. याद्वारे त्यानं इतिहासच घडवला आहे.उत्तर प्रदेशातील नोयडा इथला रहिवासी असलेल्या अयान गोयल या दहा वर्षीय मुलानं उत्तर प्रदेश शिक्षण बोर्डाची दहावीची परीक्षा दिली आणि विशेष म्हणजे सर्व विषयांमध्ये ७० टक्क्यांच्यावर गुण मिळवत त्यानं विशेष प्राविण्यात ही परीक्षा उतीर्णही केली आहे. खऱंतर दहावीची परीक्षा देण्यासाठी त्याचं वय १६ वर्षे असणं गरजेचं आहे. पण त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षीच ही कमाल करुन दाखवली आहे. त्यामुळं त्यानं उत्तर प्रदेशच्या दहावीची बोर्डाची परीक्षा देणारा सर्वात कमी वयाचा विद्यार्थी ठरला असून याद्वारे त्यानं इतिहास रचला आहे.अयानने विविध विषयांमध्ये मिळवलेल्या गुणांवर नजर टाकल्यास त्याला हिंदी (७३), इंग्रजी (७४), गणित (८२), विज्ञान (८३), समाजीक शास्त्र (७८) तर कॉम्प्युटर शिक्षण या विषयात ७० गुण त्यानं मिळवले आहेत. या सर्व विषयांमध्ये त्यानं ७० गुणांहून अधिक गुण मिळवले आहेत. त्यामुळं विशेष प्राविण्यात तो उत्तीर्ण झाला आहे.



अयाननं कमी वयात दहावीची परीक्षा का दिली?

ग्रेटर नोयडामध्ये राहणाऱ्या अयान गोयलचे वडील चार्टर अकाऊंटंट आहेत तर आई गृहिणी. अयानच्या पालकांनी सांगितलं की, कोविडच्या काळात त्याच्या वर्गातील पुस्तकं वाचून कंटाळला होता. त्यामुळं त्यानं वरच्या वर्गातील शालेय पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्याची अभ्यासातही गोडी पाहता आईनं त्याला अभ्यासातील अडचणी सोडवण्यास मदत केली. त्यानंतर अयानच्या पालकांनी त्याला थेट दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसवण्याचा निर्णय घेतला. अयानचा अभ्यास पाहता त्यांनी शाळेच्या हेडमास्तरांना त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी मागितली, हेडमास्तरांनीही त्याला विशेष कारणासाठी परवानगीही दिली.दरम्यान, अयानला पुढे इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असून त्याला JEE आणि इतर इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा देण्याचा मानस आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने