छाती फाडून दाखवली तर विखेच दिसतील; मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर सत्तारांचं विधान

मुंबई:  मागील काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच जोरात सुरू झाली आहे. या चर्चेत सुरुवातीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नाव होती. मात्र आता या रस्सीखेचमध्ये आणखी काही नाव समाविष्ट होत असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच नावही समोर आलं आहे.कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत विधान केलं आहे. विखेंनी मुख्यमंत्री व्हावं का, असा प्रश्न विचारला असता, सत्तार म्हणाले की, मित्र मोठा व्हावा असं कोणाला वाटत नाही? विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं व्हावं. मी जर हनुमानासारखा मोठा भक्त असतो, तर माझी छाती फाडून दाखवलं असतं की, माझ्या हृदयात विखे पाटीलच आहेत.



मागील काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहे. तसेच अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्या होत्या. शिवाय अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा नाव समोर आलं होतं.दरम्यान सत्तार हे शिंदे गटाचे नेते असून त्यांनीच असं विधान केल्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने