प्रभासने चाहत्यांना दिली आणखी एक भेट, 'सालार' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: 2023 मध्ये अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. प्रभासने त्याच्या आगामी चित्रपटाबाबत अपडेट दिले आहे. काही काळापूर्वी सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली होती, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता प्रभासने आणखी एका मोठ्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,"28 सप्टेंबर 2023 रोजी एक हिंसक व्यक्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुमची झोप उडवण्यासाठी तो सज्ज आहे". चित्रपटाची रिलीज डेट समोर येताच प्रभासच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली. या चित्रपटात प्रभास आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.



या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रभासच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली होती की, प्रशांत नीलसोबत प्रभासच्या आगामी 'सालार' चित्रपटाचे परदेशी राइट्स सर्वाधिक किमतीला विकले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सालार' चित्रपटाचे राइट्स करोडोंमध्ये विकले गेले आहेत. या चित्रपटात सुपरस्टार प्रभाससोबत श्रुती हासनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये 3D फॉरमॅटमध्ये रिलीज होणार आहे. 'आदिपुरुष'मध्ये प्रभास व्यतिरिक्त क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त गजानन दिसणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने