'सैफ काय आहे हे लग्नानंतर कळलं! त्यानं मला...करिनाला राहवलं नाही'

मुंबई: बॉलीवूडची बेबो म्हणून लोकप्रिय झालेल्या करिना कपूरचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. ती अभिनयासाठी जेवढी ओळखली जाते तेवढीच तिच्या फॅशनसाठी देखील सर्वांना परिचित आहे. करिना ही तिच्या परखड वक्तव्यासाठी माहिती आहे. सोशल मीडियावर अरे ला का रे करण्यात करिनाचा हात कुणी धरणारं नाही. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आपली भूमिका प्रभावीपणे मांडण्यात ती नेहमीच अग्रेसर असते.करिना आता चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे तिनं तिचा पती सैफ अली खान विषयी केलेला धक्कादायक खुलासा. करिना ही सैफिना नावानंही आता ओळखली जाऊ लागली आहे. तिनं जेव्हा सैफ अली खानशी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा तिला घरातून विरोध झाला होता. मात्र करिना ही तिच्या निर्णयावर ठाम होती. सैफचं अगोदर लग्न झालं होतं. त्याला दोन मुलं आहेत. इतक्या वर्षांनी देखील त्यांच्या संसारात कोणतंही विघ्न आलेलं नाही. त्यांचा संसार आनंदात सुरु आहे.



सैफ अलीचं खरं नाव साजिद अली खान पटोडी असे होते. मात्र त्यानं काही काळानं ते नाव बदलून सैफ अली खान असे करुन घेतले होते. करिना कपूरनं जेव्हा तिचं मॅरेज सर्टिफिकेट पाहिलं तेव्हा तिला गोष्ट कळली. लग्नासाठी त्यानं जी कागदपत्रं गोळा केली होती त्याचे नाव साजिद अली खान पटोडी असे होते. छोट्या नवाबनं देखील याविषयी खुलासा केला होता. त्यामध्ये त्याच्या नावातून पटोडी हटविण्याचे कारण त्याचे वडील कारणीभूत असल्याचे म्हटले होते.करिनाच्या दोघांच्या प्रोजेक्ट विषयी सांगायचे झाल्यास, करिनाकडे असणाऱ्या प्रोजेक्टची संख्या मोठी आहे. तिनं प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहताच्या एका चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय द क्रुमध्ये ती दिसणार आहे, त्यामध्ये करिना ही तब्बू आणि क्रिती सेनन सोबत झळकणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने